सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ईडीच्या रडारवर

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ईडीच्या रडारवर

महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ईडीच्या रडारवर आहे. नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप मेधा पाटकर यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी मेधा पाटकर यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

मेधा पाटकर प्रमुख विश्वस्त असलेल्या संस्थेच्या काही देणग्या संशयास्पद असल्याचा दावा करत संजयकुमार झा यांनी ईडी करत तक्रार केली आहे. २००५ सालचे म्हणजेच तब्बल १७ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून ईडीसोबत महसूल गुप्तचर संचालनालय आणि प्राप्तिकर विभागातही मेधा पाटकर यांच्या विरोधात तक्रार करण्यात आले असल्याचे समजत आहे.

मेधा पाटकर नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओचे मेधा पाटकर मुख्य विश्वस्त आहेत. २००५मध्ये एनजीओच्या बँक ऑफ इंडियामधील खात्यातून एका दिवसात १ कोटी १९ लाख २५ हजार ८८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याची माहिती आहे. ही सर्व रक्कम २० वेगवेगळ्या खात्यांवरून ५ लाख ९६ हजार २९४ रुपयांच्या एकसमान रकमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झालेली आहे.

मेधा पाटकर यांनी या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व अफवा असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version