कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घ्यायचं असेल, तर पाळा ‘हा’ नियम!

कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घ्यायचं असेल, तर पाळा ‘हा’ नियम!

अंगावर पूर्ण पोषाख नसेल, तर कोल्हापुरात आता देवीचं दर्शन घेणं तुम्हाला कठीण होऊ शकतं. तोकड्या पोषाखात अंबाबाईचं दर्शन घेता येणार नसल्याचा नियम पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाने घातला आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. 

यामुळे महिला आणि पुरुषांना पूर्ण पोषखात येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या निर्णयाचं भाविकांनी स्वागत केलं आहे. मात्र याचबरोबर स्त्रियांसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version