नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत असलेल्या डॉ.स्वाती चव्हाण यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांचे पती डॉ.निलेश जेजुरकर यांच्या केलेल्या चौकशीत डॉ.स्वाती चव्हाण यांचं नाव समोर येताच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. मनीषा जेजुरकर यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत तातडीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी डॉ.निलेश जेजुरकर यांना अटक केली होती. अटकपूर्ण जामिनासाठी डॉ.निलेश जेजुरकर यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. आता स्वाती चव्हाण यांच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी कोण-कोणते धक्कादायक खुलासे होणार, याकडे लक्ष लागलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.