महाराष्ट्रात शिंदे-भाजपा सरकार कायम

महाराष्ट्रात शिंदे-भाजपा सरकार कायम

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील सत्तासंघर्षाने गेले बरेच दिवस चांगलाच गदारोळ माजवला होता. प्रत्येकालाच सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतीक्षा होती. अखेरीस गुरुवारी (दि. १ मे) रोजी सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात झाली. आणि महाराष्ट्रात शिंदे-भाजपा सरकार कायम राहणार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामाच त्यांना कळीचा ठरला आहे. त्यामुळे आत उद्धव ठाकरेंची पुनर्स्थापना शक्य नाही. तर, दुसरीकडे सत्तासंघर्षाच्या फैसल्यात शिंदे-भाजपा सरकार कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोर चुका या निकालात त्यांना भोगाव्या लागल्या आहेत. तर, निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version