मानव तस्करीप्रकरणी गायक दलेर मेहंदीला अटक; जामीन

मानव तस्करीप्रकरणी गायक दलेर मेहंदीला अटक; जामीन

वृत्तसंस्था, मुंबई

गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी धरत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. पंजाबमधील पटियाला न्यायालायने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केली. मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरलाय. त्याला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल आहे. दलेर मेहंदीविरोधात एकूण 31 प्रकरणी आरोप होते.

अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप दलेर मेहंदीवर होता. मात्र, या प्रकरणी दलेर मेहंदीला अटक केल्यानंतर तातडीने जामीनही देण्यात आला. अमेरिकेत याप्रकरणी पहिला गुन्हा 2003 मध्ये दाखल करण्यात आला होता. मानव तस्करीद्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेतच पाठवण्यात आले. दलेर आणि शमशेर या बंधूंनी 10 लोकांना परदेशात ठेवल्याचा आरोप आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version