जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नेरळ येथील लॉर्ड आयप्पा इंग्लिश स्कुलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. बसची फी न भरल्याने बसचालकाने विद्यार्थिनीला तिच्या घरी न सोडता स्वतःच्या घरी सोडलं. फी घेऊन या आणि मुलीला घेऊन जा असं उत्तर दिलं.
या धक्कादायक प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मुलगी वेळेत परत न आल्याने भेदरलेल्या आई वडिलांनी बस चालकाला फोन केला. त्यानंतर सगळा प्रकार उघड झाला.
यानंतर पालकांनी बसचालक आणि मुख्याध्यापकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.