युवा ऑलिम्पिक 2018 मध्ये सौरभ चौधरीला नेमबाजीत ‘गोल्ड’

युवा ऑलिम्पिक 2018 मध्ये सौरभ चौधरीला नेमबाजीत ‘गोल्ड’

भारतीय नेमबाज सौरभ चौधरीने युवा ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेलं हे तिसरं सुवर्ण पदक आहे. आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंनी चार पदकांची कमाई केली आहे.

अवघ्या 16 वर्षांच्या सौरभने 244 अंक मिळवून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. दक्षिण कोरियाचा सुंग युन्हो हा 236.7 अंक मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिला, तर स्वित्झर्लंडचा सोलारी जॅसन याने 215.6 अंक मिळवून कांस्य पदकाची कमाई केली. सौरभचा परफॉर्मंस सातत्याने चांगला राहिला आहे. क्वालिफाइंग फेरीतही 580 अंक मिळवून सौरभ अव्वलच राहिला होता.

सौरभच्या आधी मंगळवारी 16 वर्षीय मनु भाकरने महिला पिस्टल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय. त्यामुळे नेमबाजीत भारताने आपला दबदबा निर्माण केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version