जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्याला भेट देत, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची पाहणी केली. यावेळी वयस्क महिलांनी केलेल्या श्रमदानाची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी स्वत: श्रमदान केलं.
त्यांच्यासोबत राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार बाळासाहेब पाटील यांनीही श्रमदानात सहभाग घेतला. याच कार्यक्रमात कोरेगाव तालुक्यातील न्हावी गावचं नामकरण जयपूर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.
तर, दुष्काळ मुक्तीसाठी नागरिकांनी सुरु केलेल्या श्रमदानाची चळवळीला राज्यशासनही सर्वोतोपरी मदत करेल असं आश्वासन देत, जलयुक्त शिवारमुळे राज्य २ वर्षात नक्की दुष्काळमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.