Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : "इम्तियाज जलील साप, त्यांना ठेचायला हवे" इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर शिरसाटांची संतप्त प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली आहे. 
Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : "इम्तियाज जलील साप, त्यांना ठेचायला हवे"  इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर शिरसाटांची संतप्त प्रतिक्रिया

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुंब्रातील एमआयएमची नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीयवर्तूळात वाद उफाळण्यास सुरुवात झाली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या निकालात विजय मिळवल्यानंतर एमआयएमची नगरसेविका सहर शेख यांनी 'संपूर्ण मुंब्राला हिरवा करणार' असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून राज्यातील नागरिकांकडून एमआयएमची नगरसेविका सहर शेख यांना माफी मागण्याची मागणी केली जात होती. अशातच सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे, त्यानंतर आज एमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे मुंब्र्यात आले होते. त्यावेळी त्यांनी गळ्यात ⁠भगवी मफलर घालून पत्रकार परिषद घेतली, आणि पत्रकार परिषदेत त्यांनी सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याचे पाठराखण केले आहे. अशातच आता त्यांच्या या भूमिकेवर इतर पक्षातून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. याचपार्श्वभूमिवर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली आहे. 

हेही वाचा- Republic Day 2026: चित्ररथासाठी परवानगी अन् डिझाइन कोण ठरवतं ? वाचा दिल्लीत प्रजासत्ताक दिनी दिसणार चित्ररथाची 'इनसाईड स्टोरी'
याचपार्श्वभूमिवर संजय शिरसाट म्हणाले की, "इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत, महाराष्ट्रात अंधश्रद्धा कशी पसरेल याकडे त्यांचं लक्ष आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, संत महानतांचा हा महाराष्ट्र आहे, समाजवादी चळवळीचा हा महाराष्ट्र आहे, आणि ह्याच महाराष्ट्राला एखाद्या रंगात रंगवून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सर्व नाटक आहे. खर तर यांच्यावर कारवाई करायला हवी. जिने हा शब्द वापरला होता तिने माफीनामा दिला आहे आणि हे जाऊन तिथे तेल टाकत आहे. त्यामुळे ही जी काय सापाची पिलावळ आहेत त्यांना ठेचायला हवे. काही ठिकाणी यांचे नगरसेवक आले असतील मात्र ताबडतोब भूमिका बदलून हिंदुस्तान पाकिस्तान करण्याची ही जी काही भाषा त्यांची आहे आणि त्याची यांना मस्ती असेल तर पाकिस्तानात त्यांनी जावे. भगवा संत महात्मच प्रतीक आहे, आम्ही जातीवर बोलत नाहीये मात्र तूम्ही जातीवर बोलतात, हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे काल त्यांनी गळ्यात भगवा घातला त्याला कोणी ऑब्जेक्शन घेतले का? भगव्याच वावड तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परिधान करू नका, मात्र ही संस्कृती महाराष्ट्राची आहे आणि ती आम्ही जपणार आहोत". 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version