सांगली तालुक्याला गारपीटीने झोडपले

सांगली तालुक्याला गारपीटीने झोडपले

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगली तालुक्याला शनिवारी गारपीटीने चांगलेच झोडपले. तर त्यानंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत उभ्या पिकांचे पाणी पाणी केले.

 

या पावसाने नुकत्याच छाटलेल्या द्राक्ष बागांचे फुटलेले कोंब मोडले आहेत. यामुळे द्राक्ष बाग़ायतदार शेतकरी हवालदिल झाला.

 

याबाबत तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली. जनावरांचा चारा भिजू नये म्हणून पशुपालकांना कसरत करावी लागली.

 

परिणामी, शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी प्रचंड गारपीट झाली. अनेक ठिकाणी गारांसह आलेल्या पावसाने द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळवले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version