शिवप्रतिष्ठानची गडकोट मोहीम सुरू; संभाजी भिडे गुरुजी रवाना

शिवप्रतिष्ठानची गडकोट मोहीम सुरू; संभाजी भिडे गुरुजी रवाना

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

श्री शिवप्रतिष्ठान तर्फे प्रतापगड ते रायरेश्वर अशी गडकोट मोहीमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेसाठी सांगली जिल्ह्यातून संभाजी भिडे गुरुजींसह शेकडो धारकरी प्रतापगडसाठी रवाना झालेत.

पुढील 5 दिवस 30 जानेवारीपर्यंत ही गडकोट मोहीम चालणार असून यात राज्यभरातून लाखो धारकरी टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत. दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी सांगली पोलीस दलाकडून विशेष सुरक्षा या मोहिमेस देण्यात आली आहे.

या गडकोट मोहिमेची सांगता 30 जानेवारीला रायरेश्वर जवळ उद्धव ठाकरे आणि उदयनराजे यांच्या उपस्थित होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version