सलमानच्या बहिणीची अंगठी गेली चोरीला

सलमानच्या बहिणीची अंगठी गेली चोरीला

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचा भाई जान अर्थात सुपरस्टार सलमान खान याचा अलीकडेच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. आपल्या भाचीसोबतच्या या गोड व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला. तर अशातच आता सलमानच्या घरात खळबळ उडाली आहे. सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा हिच्या घरात चोरी झाली आहे.

१६ मे रोजी अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता खान शर्मा हिच्या घरातून लाखो रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी चोरीला गेली होती. याप्रकरणी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा शोध घेतला असता याप्रकरणी पोलिसांनी ३० वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव संदीप हेगडे असे आहे.

अर्पिता खान शर्मा हिची लाखो रुपये किंमतीची हिऱ्याची अंगठी चोरीला गेली होती.या प्रकरणी ३० वर्षांच्या संदीप हेगडे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.संदीप हा विलेपार्ले पूर्व येथील आंबेवाडी झोपडपट्टीत राहणारा आहे. खारमधील अर्पिता खान शर्माच्या उच्चभ्रू घरात संदीप हाऊसकीपर म्हणून काम करायचा. चोरी केल्यानंतर तो कोणालाही न सांगता फरार झाला होता. आता त्याच्या घरातून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version