वृत्तसंस्था, मुंबई
‘मुझे लडकी मिल गयी’ या सलमानच्या एका ट्वीटमधील चार शब्दांनी चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली.
सलमान खानला लग्नाला मुलगी मिळाली कि काय असे अनेक तर्क सलमानच्या चाहत्यांनी काढले होते. मात्र, सलमानच्या दुसऱ्या ट्विटनंतर खुलासा झालाय.
सलमानला मुलगी लग्नासाठी नव्हे, तर सिनेमासाठी मिळाल्याचं सलमाननं स्पष्ट केलंय.
‘लव्हरात्री’ या सिनेमासाठी सलमान खानला हिरोईन मिळाली आहे. वरिना नावाच्या अभिनेत्रीचं सिनेमासाठी कास्टिंग करण्यात आलंय.
सलमानच्या या ट्विटनंतर सलमानला बऱ्याच नेटीझन्सने ट्रोलदेखील केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.