शेतकरी उपाशी, राज्य सरकारी कर्मचारी तुपाशी

शेतकरी उपाशी, राज्य सरकारी कर्मचारी तुपाशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत. एकीकडे शेतकरी उपाशी आहेत, तर दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचारी मात्र तुपाशी आहेत.

 

ही म्हण राज्य सरकारनं खऱी करुन दाखवली आहे. कारण ऐन उन्हाळ्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्यांनी वाढ करण्यात आली आहे.

 

महागाई भत्ता त्यामुळे 125 टक्क्यांवरुन 132 टक्के एवढा पोहोचला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख पेन्शनर्सना होणार आहे.

 

हा महागाई भत्ता 1 जुलै 2016 पासून मिळणारेय, तोही रोख स्वरुपात असेल. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही समर स्पेशल गुड न्यूज ठरली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version