एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने मोठा झटका देण्यात आला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्ते यांची दोन वर्षांसाठी सनद रद्द करण्यात आली आहे. विविध प्रकरणांच्या याचिका कोर्टात दाखल करत कोर्टाबाहेर थेट राजकीय भूमिका घेणारे वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिली दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्याद्वारे सदावर्ते यांची वकिली दोन वर्षांसाठी रद्द करण्यात येणार होती. त्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली.
वकील गुणरत्न सदावर्ते हे कोर्टात एसटी कर्मचाऱ्यांबाबत सुनावणी झाल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला येत होते. त्याच दरम्यान ते आपला न्यायालयीन गणवेश अनेकदा परिधान करून येत होते. वकिलीचा गणवेश परिधान करून बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाणे, हे बार कौन्सिलच्या नियमाला धरून नाही. इतकेच काय, गणवेश परिधान केलेला असतानाही गुणरत्न सदावर्ते हे त्या ठिकाणी नृत्य करताना निदर्शनास आले होते. आणि हीच बाब बार कौन्सिलच्या नियमात बसत नाहीत.
गुणरत्न सदावर्ते यांचे आझाद मैदानावरील उल्लंघन वकील सुशील मंचरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिलकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्षे कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.