जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन कार्यक्षम व्हावं यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे दोघांचाही एकत्र असा एकच झोन करावा. अशी सूचना सचिन तेंडुलकरने केलीय.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सचिनने पत्र लिहिले असून तुम्ही या कल्पनेला पाठिंबा द्याला अशी अपेक्षा व्यक्त केलीय. तसेच, यातल्या अंमलबजावणीच्या समस्यांवर मात कराल, असा विश्वासही सचिननं आपल्या पत्रातून व्यक्त केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.