सचिन सावंत यांच्या हत्येमागचं कारण अद्याप गुलदस्तात

सचिन सावंत यांच्या हत्येमागचं कारण अद्याप गुलदस्तात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील मालाडमध्ये शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या झाली. या हत्येमागे एसआरएच्या वाद कारणीभूत असल्याची शंका व्यक्त होत आहे. शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांच्या रविवारी रात्री कांदिवली येथे झालेल्या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींना शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. वैयक्तिक सूड, कुरार परिसरातील एसआरए प्रकल्प, बिल्डर वर्गातील स्पर्धा अशी काही कारणे प्राथमिक स्तरावर तपासून पाहिली जात आहेत.

कुरार भागात एसआरए प्रकल्पांची संख्या लक्षणीय असून त्यातील आर्थिक देवघेवीतूनही हल्ला झाल्याचा तर्क लावण्यात येत आहे. सावंत यांना शाखाप्रमुखपदी पदोन्नती मिळणार होती, असेही सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठीही हल्ला होऊ शकतो का, या दिशेने तपास सुरू आहे. पूर्ववैमनस्य तसेच एसआरए प्रकल्पातील हितसंबंधाचाही मुद्दा तपासून पाहिला जात आहे. सावंत हे पाच वर्षांपूर्वी अंधेरी येथून कुरार भागात राहण्यास आले. इथे पक्षात उपशाखाप्रमुख पद मिळवण्यात ते यशस्वी ठरले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version