जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सध्या देशभरात टी 20 क्रिकेटची धूम सुरू असताना, वांद्र्यातल्या रस्त्यावर एक वेगळीच मॅच रंगली होती. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. हा देव सध्या रिटायर झाला असला तरी तो रस्त्यावर उतरून क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.
रविवारी रात्री वांद्र्यामध्ये हॉटेलात काम करणारी काही मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळत होती. त्याचवेळी सचिन तेंडुलकर तिथून गाडीतून निघाला होता. या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून सचिनलाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यानंही या मुलांबरोबर क्रिकेटचा आनंद लुटला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.