जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठी सिनेक्षेत्रातील निर्माता गौतम अधिकारी यांचं आज सकाळी निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 67 वर्षे होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
गौतम अधिकारी यांनी बंधू मार्कंड अधिकारी यांच्यासोबत मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या ‘सब टीव्ही’ या वाहिनीची स्थापना केली. गौतम यांनी टीव्हीवरील अनेक मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले होते. मालिकेच्या सर्वाधिक भागांचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. या विक्रमाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद झाली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.