नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबा प्रकरणानंतर राजकीयवर्तूळ चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर अशोक खरात आणि रूपाली चाकणकरांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकणावर अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. राजीनाम्यापूर्वी रूपाली चाकणकर यांनी मुंबईमध्ये पोलीस महासंचालकांची देखील भेट घेतली. दरम्यान रूपाली चाकणकर यांनी या सगळ्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता रुपाली चाकणकर यांचं पहिलं ट्विट समोर आलं आहे. दरम्यान आपल्या या ट्विटसोबत त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिलेलं एक दोन पानांचं पत्र देखील जोडलं आहे.
आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता… pic.twitter.com/ogoLtBJFfE — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 20, 2026
रूपाली चाकणकर यांचे ट्वीट काय?
“आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.”
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिलेलं पत्र
क्रमांकः ममा/मार्च-२६/प्रसारका०/457
दिनांक: २०.०३.२०२६
प्रत,
श्री. सदानंद दाते,
पोलीस महासंचालक कार्यालय,
शहीद भगतसिंग मार्ग,
कुलाबा, मुंबई – 400001
विषयः नाशिक येथील अशोक करात (कैप्टन) माध्यावर दाखल बलात्कार प्रकरणाची स्थापित विशेष तपास पथक (1) मार्ग सोल व नित्यक्ष चौकशी करण्याबाबत.
संदर्भः नाशिक शहर, सरकारवाडा पोलीस ठाने येथे दाखल गुन्हा 70/2026, कलम श. 04, 74 व 351 भारतीय न्याय संहिता अंधश्रद्धा निर्मुलन अधिनियम कलम 3(५) (1)
महाराष्ट्र राज्य महिला आयोगावी स्थापना महाराष्ट्र राज्जया महिला आयोग अधिनियम, 1993 मुतार कराप्यात आली आहे. सदर अधिनियमाच्या कलम १० अन्वये योगाची कर्तव्ये निश्चित करण्यात आलेली आहेत. भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या संरक्षणाामक अधिकारांया अनुषंगाने विविध विषयांवर सखोल कामकाज करण्याची जबाबदारी आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. तीच संधान व इतर कायद्यांमधील महिलांना बाधक वरणाच्या तरतुदींचा वेळोवेळी आधाबा घेणे व त्यातील उणिवा, अपूर्णता किंवा दोष दूर करण्यासाठी सुपाराामक उपाययोजना सुचविण्याचे अधिकार आयोगास प्रदान करण्यात आलेले आहेत.
उपरोका विषयास अनुसरून, नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (कॅप्टन) याने एका 35 वर्षीय महिलेवर गेल्या तीन वर्षापासून वारंवार बलात्कार करणाची आणि तिला धमपणवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडे 58 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग या घटनेची आर्थत गांभीयनि दखल घेत आहे, सदर प्रकरण हे केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसुन, आरोपीने श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अनेक महिलांग लैंगिक शोषण केल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरमाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, राज्य शासनाने या तपासासाठी आ (विशेष तपास पथक) नियुक्त केले आहे. जाबपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास निष्यत व लवकरात लवकर होईल माची मला खात्री आहे. महिला आयोगाच्या वतीने आपनास कळविते की,
१. प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकसी पीचे समाजातील विविध स्तरांतील लोकांशी असलेले
संबंध पाहता, तपासावर कोणताही राजकीय किया बाह्य दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन स्थापित विशेष तपास पथक (का) नै निपक्षपातीपणे तपास करावा,
२. पीडितांचे परिवाण: सापडलेल्या ८७ व्हिडिओगील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घेण्यात यावे आणि गाना आवश्यक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.
३. कठोर कायदेशीर कारवाई आरोपीने जर डिजिटल पुराने (व्हिडिओ) ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील, तर त्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) वाढीव कलमे लावून कडक कारवाई करण्यात यावी.
४. कालबद्ध तपास सदर प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादित पूर्ण करून दोषारोपपत्र (Charge sheet) लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावे, जेणेकरून पीडित महिलांना न्याय मिळेल.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाचा प्रगती अहवाल वेळोवेळी आयोगाला सादर करण्यास पोलीस आयुक्त नाशिक यांना कळवावे, ही विनंती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.