मसाल्यांचे बादशाह म्हणून ख्याती असलेले आणि जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले एमडीएच मसाचे कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाल्याची अफवा पसरत होती.
अनेक माध्यमांच्या अहवालांनुसार, असे सांगण्यात आले की शनिवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले. पण नंतर हे उघड झाले की धर्मपाल गुलाटीच्या मृत्यूची बातमी ही अफवा होती.
नवी दिल्लीतील एका खासगी रूग्णालयात त्यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.
चुन्नी लाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. १००० च्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे.
अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते.
अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचा मुलगा राजीव गुलाटी हे आता व्यवसायाचा हा पसारा समर्थपणे पुढे नेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.