जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
रिलायन्स फ्रेश कंपनीच्या कारभराला कंटाळून शेतकऱ्यांनी शेतमाल कंपनी समोर फेकून संताप व्यक्त केला. पुण्याच्या खेड तालुक्यात रिलायन्स फ्रेश कंपनी शेतमाल शेतकऱ्यांकडून खरेदी करते. मात्र, तो माल खराब असल्याचा दावा करत शेतमाल कंवनीकडून शेतकऱ्यांना पुन्हा पाठवला जात आहे.
एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचा शेतमालाल हमीभाव कर्जमाफी सारख्या संकटांचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे कंपनी शेतमालाची निवड करुन सुद्ध तो शेतमाल खराब असल्याचं कारण देत तो शेतमाल परत देत शेतकऱ्यांना बिल देण्यास नकार देते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.