वृत्तसंस्था, मुंबई
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दोन दिग्गज सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन हे दोघेही राजकारणात येणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर रविवार दुपारी रजनीकांत यांच्या घरी कमल हसन स्नेहभोजनासाठी पोहोचले. त्यांच्या या भेटीमुळे तामिळनाडूतील राजकारणाला नवं वळण मिळणार आहे. आपली ही भेट राजकीय चर्चेसाठी झाली नसल्याचं कमल हसन यांनी म्हटलय.
ही भेट केवळ एक सदिच्छा भेट असल्याचंही त्यांनी सांगितलं. कमल हसन यांची तामिळनाडूतील लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे. ते राजकारणात केवळ प्रसिद्धीसाठी आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना यश मिळो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो अशी सदिच्छा रजनीकांत यांनी व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.