भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी घेतली शपथ

भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी घेतली शपथ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. या वेळी भारताचे सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर यांनी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची शपथ

दिली.

 

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण

आडवाणी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह विविध पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते.

 

पहिल्या अभिभाषणात कोविंद यांनी विविध विषयांवर भाष्य केले. विविधता हेच आपल्या देशाचं सामर्थ्य असून देशाचे ऐक्य कायम राहिल याची काळजी घेऊ असे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

 

हे शतक भारताचे असून जगाला आर्थिक नेतृत्व देणारा देश निर्माण करायचाय  तसेच शेतकरी, वैज्ञानिक, आदिवासी, युवक हे आपल्या देशाचे राष्ट्रनिर्माते असल्याचे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version