तनुश्रीने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला – राखी सावंत

तनुश्रीने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला – राखी सावंत

बॉलीवूडमध्ये सध्या #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत, तसेच या मोहिमेत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत.

तनुश्री दत्ताने नानांवर आरोप केल्यापासून #MeToo  मोहिम चांगलीच पेट घेत आहे, मात्र आता चक्क राखी सावंतने तनुश्रीवर गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात राखी सावंतने पत्रकार परिषद बोलावली होती.

पत्रकार परिषदेत राखी काय म्हणाली?

  • पत्रकार परिषदेत राखी म्हणाली की #MeToo चा गैरवापर केला गेला आहे मीटू-मीटू खूप होत आहे, आता SheToo चीही वेळ आली आहे.
  • तसेच यावेळी राखीने तनुश्री दत्ताने 12 वर्षापूर्वी माझ्यावर बलात्कार केला आहे असा गंभीर आरोप तनुश्रीवर केला आहे.
  • तनुश्री दत्ता ही लेस्बियन आहे, तिने माझा वारंवार बलात्कार केला आहे.
  • तुम्हाला वाटेलं हे कसं होऊ शकतं? एक मुलगी दुसऱ्या मुलीचा रेप कसा करू शकते? पण तुम्हाला माहिती असेल की, कलम 377 लागू झाले आहे.
  • गे आणि लेस्बियन संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.
  • तनुश्री दत्तावर गंभीर आरोप करत राखी म्हणाली की, तिने मुंडण का केले होते तुम्हाला माहिती नसेल.
  • ती प्रत्यक्षात एक पुरुष आहे. ती 12 वर्षांपूर्वी माझी बेस्ट फ्रेंड होती. तिने मला बऱ्याचदा रेव्ह पार्टीत नेले अन् तेथे सिगारेट रिकामी करून हिरव्या रंगाचा पदार्थ तिच्यात भरला. तिच्यासोबत मलाही ओढायला लावली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version