दोघात तिसरा, आता सौहार्द विसरा?

दोघात तिसरा, आता सौहार्द विसरा?

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानावर महाराष्ट्रातील मोठी सत्तासमीरणं अवलंबून आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी कंबर कसली आहे. अपक्षांनी निवडणुकीत मदत करावी असे प्रयत्न मविआ आणि भाजपकडून सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचा उमेदवर जिंकणार की विरोधी पक्ष भाजपचा? याची उत्सुकता आहे.

आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सहा जागांसाठी राजकीय पक्षांच्या मतगणितांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी सर्व राजकीय पक्षांची मदार अपक्ष-छोट्या पक्षांवर अवलंबून आहे. प्रत्यक्ष मतांपेक्षा शिवसेना आणि भाजपाकडून अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

आज पारपडणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेसाठी कोण आहेत उमेदवार?

  • पीयूष गोयल विद्यमान केंद्रीय मंत्री आणि नेताभाजपा
    डॉ. अनिल बोंडेमाजी कृषीमंत्री आणि नेताभाजपा
    धनंजय महाडिकनेताभाजपा

  • संजय राऊतसंसदीय गटनेताशिवसेना
    संजय पवारजिल्हाप्रमुखकोल्हापूर (ग्रामीण)

  • प्रफुल्ल पटेलनेता राष्ट्रवादी आणि माजी केंद्रीय मंत्री

  • इम्रान प्रतापगढी अध्यक्षअल्पसंख्याक विभागकाँग्रेस

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version