भाजपच्या अडचणीत वाढ; राजू शेट्टींचे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत

भाजपच्या अडचणीत वाढ; राजू शेट्टींचे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

 

सत्तेतून बाहेर पडण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

 

पुण्यात पिंपरी-पेंढारमध्ये एकाच गावातील 58 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 

राजू शेट्टी यांनी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

 

सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी आपण करत असल्याचंही त्यांनी सांगितले.

 

तर, एकीकडे सरकार संपाचा फारसा परिणाम नसल्याचं सांगतानाच दुस-या बाजूला बाजार पेठेत माल न आल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा सांगतंय, यातून

सरकारचा भोंगळपणा उघड होतोय अशी टीकाही त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version