जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
अच्छे दिनचं गाजर दाखवून लुबाडणाऱ्या मोदी सरकारला गाडून टाका, असं आवाहन खासदार राजीव सातव यांनी केले आहे.
आखाडा बाळापुर इथ आज काँग्रेसच्या वतीन हैद्राबाद अकोला महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदेलन करण्यात आले होते.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत हजारो शेतकरीही रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यात आलेलं अपयश, पीकविमा अर्ज भरताना शेतकऱ्यांची होणारी गैरसोय इत्यादी अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे.
त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले आंदोलनात शेतकरी आत्महत्येचा देखावा ही उभारण्यात आला होता. हा देखावा चर्चेचा विषय ठरला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.