Shivsena Politics: भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम; शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची स्पष्ट भूमिका

पक्षांतर्गत बैठकीत त्यांना वारंवार डावलले जात असल्याचा त्यांनी आरोप केला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी ते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
Shivsena Politics: भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम; शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची स्पष्ट भूमिका

विजय चिडे, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर: शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना विश्वासात घेतले जात नसल्याने ते शिवसेनेला रामराम ठोकणार, अशा चर्चेला पेव फुटले होते.

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख जंजाळ हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्या चर्चेला तूर्तास फुलस्टॉप लागलेला आहे. आज राजेंद्र जंजाळ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, “मी भाजपमध्ये जाणार नाही. तसा काही विचार नाही, तशी चर्चा देखील नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत होणाऱ्या बैठकीत त्यांना डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या विभागात विरोधकांना मोठे केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar : भाजीत शिजलेली पाल; वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, काहींना उलट्या तर काहींनी…

शिवसेनेत फूट पडली तेव्हा आम्ही संघर्ष केला आहे, असे सांगत जंजाळ म्हणाले की, “महानगरपालिकेमध्ये कुठेतरी शिवसेनेच्या निष्ठावंतांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. हे मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकणार आहे.”

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध बैठकांमध्ये त्यांना डावलले जात असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. तसा काही निर्णय नाही, चर्चा नाही. “ज्या पक्षाचा मी जिल्हाप्रमुख आहे, त्या पक्षात काय चालले आहे आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी मी काम करत आहे,” असेही जंजाळ यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा: Raj Thackeray: 'मुंबई' नावावरून राज ठाकरे यांचा केंद्रावर प्रहार; म्हणाले "मराठी माणसा…."

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version