‘देशाचे रखवालदार झोपा काढतायत’! नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

‘देशाचे रखवालदार झोपा काढतायत’! नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालून परदेशी पलायन करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

“देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, आताचे रखवालदारही झोपा काढण्याचं काम करत असल्यामुळे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून जात असल्याची”, टीका राज ठाकरेंनी केली आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी मोदी-जेटली जोडीवर टीका करणारं व्यंगचित्र शेअर केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version