जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. दरवर्षी ९ जून पर्यंत संपूर्ण राज्य व्यापणारा मान्सून अद्याप देखील सक्रिय झालेला नाही. यामुळे राज्यात उष्णतामान हे वाढलेले आहे. दरम्यान, या वाढत्या उष्णतेपासून आज राज्यातील काही जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. पुढील पाच दिवस पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामांन विभागाने वर्तवली आहे. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्यासह काही जिल्ह्यात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवस संमिश्र हवामान राहणार आहे. तर विदर्भात मात्र, उष्णतेची लाट येणार आहे. या काळात गरज असल्याच घराबाहेर पडावे तसेच उन्हापासून रक्षण करावे असे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे.
पुण्यात आज हवामान ढगाळ राहणार आहे तर तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, जालना बुलडाणा या जिल्ह्यांमध्येही विजाच्या कडकडाटसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.