Maharashtra Weather Update : पावसाचा जोर कमी! तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बरसणार तुफान पाऊस; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांतील पावसाची ताजी अपडेट

Maharashtra Weather Update : पावसाचा जोर कमी! तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बरसणार तुफान पाऊस; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांतील पावसाची ताजी अपडेट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तुफान बरसणाऱ्या पावसाने आज, बुधवार पहाटेपासून काहीशी उसंत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र पुढील काही तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये काही दिवस कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, बुधवार 8 जुलै आणि गुरुवार 9 जुलै रोजी जिल्ह्यांना यलो, दोन ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

हेही वाचा : Heavy Rainfall Forecast: राज्यावर अस्मानी संकट! पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे; 9 जिल्ह्यांना यलो तर 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

कोकण विभागातील पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि घाटामाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे.  

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या घाटमाथा परिसरात पावसाचा अंदाज असून यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version