जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अल निनोचा प्रभाव कमी झाल्यानं आणि गेल्या 3 आठवड्यांत परिस्थिती अनुकूल असल्यानं पाऊस जास्त पडण्य़ाची शक्यता आहे. सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असं हवामान खात्यानं म्हटलं.
भारतात जून ते सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा हंगाम असतो. वर्षभरातील 70 टक्के पाऊस या काळात पडत असल्यानं शेतीचं गणित प्रामुख्याने या पावसावर ठरतं. शेतीचं मुबलक उत्पादन हे एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं ठरतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या पावसाकडे लागून राहिलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.