शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर सुवर्ण होनांनी अभिषेक

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर सुवर्ण होनांनी अभिषेक

रायगड: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा सोहळा अवघ्या काही मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीतच साजरा करण्यात येणार आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार होणारे सर्व कार्यक्रम मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत होणार आहेत. तर, शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करीत कोरोनाच्या महामारीमुळे शिवप्रेमींना घरूनच शिवराज्याभिषेक साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावर्षी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सुमारे ३५० वर्षांनी सुवर्ण होनांनी अभिषेक करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज असलेले खासदार संभाजीराजे भोसले यांना ‘होन’ सुपूर्द करण्यात येणार असल्याने हा आपल्यासाठी आणि राज्यासाठी एक सुवर्णक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version