Raigad Dahi Hand: रायगडची सर्वात हटके दहीहंडी! विहिरीवरून उंच उडी घेत गोविंदांचा थरार, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

राज्यभर दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना रायगड जिल्ह्यातील अलीबाग तालुक्यातील कुर्डूस गावातील विहिरीवरील दहीहंडी यंदाही विशेष आकर्षण ठरत आहे.
Raigad Dahi Hand: रायगडची सर्वात हटके दहीहंडी! विहिरीवरून उंच उडी घेत गोविंदांचा थरार, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

रायगड : राज्यभर दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना रायगड जिल्ह्यातील अलीबाग तालुक्यातील कुर्डूस गावातील विहिरीवरील दहीहंडी यंदाही विशेष आकर्षण ठरत आहे. पारंपरिक मानवी मनोऱ्याऐवजी विहिरीच्या काठावरून उंच उडी मारत हंडी फोडण्याची अनोखी परंपरा पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत.मुंबईतील लाखोंच्या बक्षिसांच्या आणि सेलिब्रिटींच्या दहीहंड्यांची चर्चा होत असली, तरी ग्रामीण भागातील अशा पारंपरिक उत्सवांनाही वेगळे महत्त्व आहे. कुर्डूस गावातील ही परंपरा गेली ३४ वर्षे अखंडपणे सुरू असून, प्रत्येक वर्षी गोविंदांच्या धाडसी उड्यांचा थरार पाहण्यासाठी परिसरातील गावांमधून नागरिक गर्दी करतात.

विहिरीवरची अनोखी परंपरा

गावाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीवर उंचावर दहीहंडी बांधली जाते. त्यानंतर गोविंदा विहिरीच्या काठावरून जोरदार उडी घेत हंडी गाठण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मानवी मनोरा रचला जात नाही; तर अचूक वेळ साधत घेतलेली उंच उडीच यशाची गुरुकिल्ली ठरते. यंदाही अनेक गोविंदांनी आधी सराव करून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हंडी नेहमीप्रमाणे उंचावर बांधल्याने अनेकांना ती गाठणे कठीण गेले. त्यामुळे हंडीचा प्रयत्न करताना अनेक गोविंदांना थेट विहिरीत उड्या घ्याव्या लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जिल्ह्यात उत्सवाची धूम

रायगड जिल्ह्यात यंदा हजारो दहीहंड्या साजऱ्या होत असून, अनेक ठिकाणी बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र, कुर्डूस गावातील विहिरीवरील दहीहंडीची वेगळी ओळख कायम आहे.या अनोख्या परंपरेत धाडस, कौशल्य आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. त्यामुळे ही दहीहंडी केवळ गावापुरती मर्यादित न राहता रायगडमधील सर्वाधिक चर्चेचा उत्सव बनली आहे. प्रत्येक वर्षी या परंपरेची उत्सुकता कायम राहते आणि गोविंदांच्या उंच उड्या पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version