जय महाराष्ट्र न्यूज, जालना
गारपिटीत मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करण्याचे आदेश जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढला होता. मोठ्या जनावरांचे पोस्टमार्टम करतात हे एकलं होतं. मात्र, कोंबड्यांचे पोस्टमार्टम होतं हे पहिल्यांदाच एकल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. तर शेतकऱ्यांना तातडीने आणि भरिव मदत करण्यात यावी, अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला सळो की पळो करू असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केले.
गुरुवारी विदर्भ मराठवाड्यात झालेल्या गारपिटीनंतर अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखेपाटील यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी जालन्यातील वजांर, उम्रज या गारपीटग्रस्त गावांची पाहाणी केली. तसेच, या गारपिटीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एक लाखाची मदतही करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.