Pune Porsche Car Accident : जेलमधून सुटताच आरोपीची जंगी पार्टी; अग्रवाल कुटुंबीयांच्या वागणुकीवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतरही अग्रवाल कुटुंबाची ही मस्ती आणि बदललेली संतापजनक वर्तणूक पाहून पुणेकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Pune Porsche Car Accident : जेलमधून सुटताच आरोपीची जंगी पार्टी; अग्रवाल कुटुंबीयांच्या वागणुकीवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

Pune Porsche Car Accident : पुण्यातील बहुचर्चित आणि संवेदनशील पोर्श कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबीयांचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका महिन्यापूर्वीच न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. मात्र, जेलबाहेर येताच या संपूर्ण कुटुंबाने कोणतीही खंत न बाळगता थेट एका जंगी पार्टीचे आयोजन केल्याचे या व्हिडिओमध्ये उघड झाले आहे. ‘जय महाराष्ट्र’ने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला असला तरी चॅनेल या व्हिडिओच्या सत्यतेची अधिकृत पुष्टी करत नाही.

‘दोस्त को सलाम’ गाण्यावर थिरकले अग्रवाल कुटुंब
नोटांचे हार आणि नृत्य : या पार्टीत विशाल अग्रवालने आपल्या पत्नीसह गळ्यात चक्क नोटांचे हार घालून डान्स केल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मस्तवालपणा कायम: ‘मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो’ या प्रसिद्ध गाण्यावर हे कुटुंब बेभान होऊन नाचताना दिसत आहे. दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतरही अग्रवाल कुटुंबाची ही मस्ती आणि बदललेली संतापजनक वर्तणूक पाहून पुणेकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Crime News : क्रूरतेचा कळस! वृद्ध दाम्पत्याचा धारदार शस्त्राने गळा चिरला, मृतदेहावर टाकली राख अन् पालापाचोळा; आजी-आजोबांचा मृतदेह पाहून नातवाचा थरकाप

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version