Auramine: ऑरामाईनचा वापर थांबवा…! प्रियंका चतुर्वेदी यांची सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी

शिवसेना राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि खाद्य प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांना पत्राद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.<br/>
Auramine: ऑरामाईनचा वापर थांबवा…! प्रियंका चतुर्वेदी यांची सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी

Auramine: भाजलेल्या चण्यांसह विविध खाद्यपदार्थांमध्ये रंग वाढवण्यासाठी औद्योगिक डाय ऑरामाईनचा बेकायदेशीर वापर होतोय, असा गंभीर वापर राज्यसभेत उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेना राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि खाद्य प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांना पत्राद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – Water Cut In Thane: ठाण्यात 24 तासांसाठी पाणी कपातीची घोषणा; कोणत्या भागांमध्ये सेवा बंद राहणार? वाचा सविस्तर बातमी

लाखो नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका 

चतुर्वेदींच्या पत्रानुसार, नुकत्याच मिळालेल्या पुराव्यांनुसार ऑरामाईन हा डाय मुख्यतः कपडे आणि लेदर रंगवण्यासाठी वापरला जातो. मात्र, याच औद्योगिक डायचा बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थांमध्ये, विशेषतः भाजलेल्या चण्यांमध्ये वापर होत असल्याचे आढळले आहे. ऑरामाईनचा वापर केवळ अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन नाही, तर तो लाखो नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका पोहोचवतो, असा इशारा चतुर्वेदी यांनी दिला आहे. 

हेही वाचा – Mhada Pune Lottery 2025 : म्हाडा घरांसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल; अंतिम तारीख जवळ, नागरिकांनो हे काय जाणून घ्या?

ऑरामाईनमुळे कर्करोगाचा धोका 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय कॅन्सर संशोधन संस्थेच्या (IARC) अभ्यासानुसार ऑरामाईनमुळे कर्करोगाचा धोका असतो. तसेच, याचा परिणाम किडनी, यकृत आणि स्वादुपिंडावरही होऊ शकतो, असंही चतुर्वेदी यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. तथापी, ऑरामाईनसारख्या धोकादायक पदार्थांचा वापर बाजारात सुरू आहे. प्रशासनाकडून नियमित तपासण्या होत नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर दोषींवर तातडीने कारवाई व्हावी आणि आरोग्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही चतुर्वेदी यांनी केली आहे. चतुर्वेदी यांनी पत्राद्वारे सरकारकडे तातडीने तपास आणि दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version