‘गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव’

‘गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव’

नाशिक पोलिसांनी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच पार्श्ववभूमीवर बोलत असताना गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तर, ‘शरण यावं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल’ केल्याचे वक्तव्य राऊतांनी केले आहे.

मागील आठवड्यात संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांनी शनिवारी नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्याप्रकरणी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून देखील प्रतिक्रिया दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version