जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘ठाकरे’ चित्रपटाच्या इंग्रजी पोस्टरवरून अभिनेते प्रवीण तरडेंनी शिवसेनेला विचारणा केलीय. प्रवीण तरडेंनी शिवसेनेला सवाल केलाय. ‘ठाकरे’च्या इंग्रजी पोस्टरचं शिवसेना काय करणार?” असा सवाल त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन सेनेला केलाय.
प्रवीण तरडे यांच्या 2015 मध्ये आलेल्या ‘देऊळबंद’ चित्रपटाचं इंग्रजी पोस्टर शिवसेनेनं आक्षेप घेत इंग्रजी ऐवजी मराठी करायला लावलं होतं. सेनेच्या आक्षेपानंतर देऊळबंदचं पोस्टर बदलण्यातही आलं. आता मात्र, शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ठाकरे, याचं पोस्टर इंग्रजीत केलंय.
त्यावर अभिनेते प्रवीण तरडेंनी सवाल केलाय. ठाकरेंच्या इंग्रजी पोस्टरचं शिवसेना आता काय करणार? अशी विचारणा त्यांनी केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.