प्रकाश आंबेडकरांना निवडणूक आयोगाची नोटीस

प्रकाश आंबेडकरांना निवडणूक आयोगाची नोटीस

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला असून येत्या 29 एप्रिल रोजी महाराष्ट्रात चौथा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे. ईव्हीएम यंत्रणामध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान करताना मत दुसऱ्याच उमेदवाराला जात असल्याचा आरोप अमोल सुरवाडे यांनी केला होता. त्याचबरोबर या आरोपाच्या आधारावर बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रकाश आंबेडकर यांना नोटीस बजावली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

तिसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी रावेर मतदारसंघात मतदाराने मतदाराविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या आरोपाच्या आधारे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.

तसेच प्रत्यक्षात अशा पद्धतीची घटना घडली नसून केवळ अफवा असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

तसेच मतदान यंत्रात फेरफार होत नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढे कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version