पावसात विलंब झाल्यास दुबार पेरणीची शक्यता

पावसात विलंब झाल्यास दुबार पेरणीची शक्यता

कोकणातील भात शेतीचा विचार करता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमीन नांगरून भात पेरणी केली जाते. भाताची रोपे साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात काढली जातात आणि त्याची लावणी केली जाते. हे चक्र व्यवस्थित रहाण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात तरव्याची पेरणी होणं गरजेचं असत. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतीच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता गेल्यावर्षी ८० ते ९० टक्के भात पेरणी पूर्ण झाली होती यंदा मात्र १५ ते २० टक्केच पेरण्या झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version