YouTube झाले बंद..जाणून घ्या कारण

YouTube झाले बंद..जाणून घ्या कारण

YouTube बंद पडल्याने अनेक नेटकरी बेचैन झाले आहेत. अमेरिका, आशिया, इंग्लंड व ऑस्ट्रेलियासह जगभरात YouTube गेल्या एक ते दोन तासांपासून ठप्प झाले होते.

YouTube बंद पडल्याने अनेक नेटकरी बेचैन झाले आहेत. YouTube सुरू केल्यानंतर स्क्रीनवर internal error 500 असा मेसेज येत होता. नेटकऱ्यांनी ट्विटरवर याचे स्क्रीनशॉट टाकले. भारतासह YouTube वापरकर्त्यांनी ही समस्या ट्विटरवर शेअर केली आहे. 

कंपनी शक्य तितक्या लवकर या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ट्विटरवर जारी केलेल्या एका निवेदनात YouTube ने लिहिले, “YouTube, YouTube टीव्ही आणि YouTube संगीत समस्येबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी धन्यवाद. आम्ही या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपणास झालेल्या  गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version