पोलीस उपनिरीक्षकाचे तक्रारदार महिलेशी गैरवर्तन

पोलीस उपनिरीक्षकाचे तक्रारदार महिलेशी गैरवर्तन

पोलीस उपनिरीक्षकाचे तक्रारदार महिलेशी गैरवर्तन

संभाजीनगर, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: संभाजीनगरमध्ये पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेशी गैरवर्तन करण्यात आले. ही माहिती संबंधित महिलेने प्रसारमाध्यमांना दिली. फाशी घ्यायची असेल तर पोलीस ठाण्यातच घे असं म्हणत पोलीस उपनिरीक्षकाने महिलेची पोलीस ठाण्यातून हकालपट्टी केली.

चैत्रा रेखडगेवाड असे संबंधित महिलेचे नाव आहे. या महिलेनी पीएसआय सुनील शिंदे यांच्याकडे तीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. यासाठी महिला गेल्या काही दिवसांपासून पोलीस ठाण्यात चकरा मारत होती. पोलीस उपनिरीक्षक सुनील शिंदे यांनी फाशी घ्यायची असेल तर पोलीस ठाण्यातच फाशी घे असं म्हणत महिलेचा अपमान केला, असे महिलेकडून सांगण्यात आले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version