नाशिक: इगतपुरीच्या रिसॉर्टमध्ये डांसपार्टीवर पोलिसांचा छापा

नाशिक: इगतपुरीच्या रिसॉर्टमध्ये डांसपार्टीवर पोलिसांचा छापा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्‍यातील तळेगाव शिवारात मिस्टीक व्हॅली या रिसॉर्टवर सुरू असलेल्या डान्सपार्टीवर पोलिसांनी छापा टाकून दहा जणांना अटक केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात असलेल्या मिस्टीक व्हॅली परिसरातील नऊ क्रमांकाच्या बंगल्याच्या परिसरात, मध्यरात्रीच्या सुमारास डान्सपार्टी सुरू होती. अतिशय कर्णकर्कश साऊंड सिस्टिमच्या आवाजाने सदरच्या ठिकाणी डान्सपार्टी सुरू होती. इगतपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता, पायात घुंगरू व तोकडे कपडे घालून 6 मुली डान्स करीत होत्या. तर 10 संशयित हे मद्याच्या नशेत नाचत होते. पोलिसांनी यावेळी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. 

मुंबईतून डान्ससाठी आणण्यात आलेल्या 6 मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असले तरी वारंवार अशा घटना इगतपुरी परिसरात होत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version