इस्रायलमध्ये हिब्रूत संवाद साधत पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का

इस्रायलमध्ये हिब्रूत संवाद साधत पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय इस्रायल दौऱ्यावर दाखल झाले आहेत. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

 

या ऐतिहासीक प्रसंगी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामन नेत्यान्याहू यांनी प्रोटोकॉल बाजून ठेवत  मोदींच्या स्वागतासाठी तेल अवीव विमानतळावर उपस्थिती लावली.

 

यावेळी त्यांनी हिंदीतून मोदींचं स्वागत केले. मोदी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रगीताची धूनसुद्धा वाजवण्यात आली.

 

यानंतर मोदींनीसुद्धा पत्रकार परिषदेत संवाद साधताना हिब्रूत सुरूवात करुन, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

 

मोदींच्या या तीन दिवसीय दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता असून या दौऱ्यात मोदी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात बचावलेल्या

मोशेचीही भेट घेणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version