शिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे, यासाठी पंतप्रधान 9 वाजण्याच्या सुमारास शिर्डीत दाखल होणार आहेत.
सुरुवातीला ते साई समाधीचे दर्शन घेणार आहेत, दरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या घरांची चावी पंतप्रधानांच्या हस्ते 20 हजार लाभार्थींना देण्यात येणार आहे.
यावेळी होणाऱ्या छोटेखानी सभेमध्ये पंतप्रधान राममंदिराच्या मुंद्दयावर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीलेआहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.