वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांनी गांधीनगरमधील सेक्टर 22 येथील शाळेत जाऊन मतदान केले. त्यांचं वय 97 वर्षे आहे.
त्यांनी मतदानाला महत्व देत या वयातदेखील मतदान केलयं. हिराबेन यांच्यासोबत पंकज मोदी उपस्थित होते. पंकज मोदी त्यांना घेऊन मतदान केंद्रात पोहोचले. वयाच्या 97 व्या वर्षी मतदान करत हिराबेन इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.