पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’…

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’…

पर्यावरण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च पर्यावरण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी पंतप्रधानांना सन्मानित केले. २६ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

याप्रसंंगी मोदी असं म्हणाले – 

  • पर्यावरणाची काळजी घेणे ही प्राचीन काळापासून भारताची संस्कृती आहे.
  • निसर्गाला परमात्मा समजण्याची भारताची परंपरा आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार हा त्या परंपरेचा सन्मान आहे.
  • पृथ्वी आणि पर्यावरणाची काळजी करणाऱ्यांचा हा सन्मान आहे.
  • जे पर्यावरणाकडून घेतात पण तितकच निसर्गाला देतात सुद्धा त्यांचा हा सन्मान आहे.
  • हा माझा नव्हे सर्व भारतीयांचा सन्मान आहे. पर्यावरण रक्षणासाठी सर्व भारतीय कटिबद्ध आहेत.
  • भारतातील आदिवासी वर्ग, मच्छीमार, जंगलावर प्रेम करणाऱ्यांचा हा सन्मान.
  • हे भारताच्या शेतकऱ्यांचा सन्मान आहे, ज्यांच्यासाठी  ऋतुचक्र हे जीवन चक्र आहे. जगातील सर्वात वेगवान शहरीकरणामध्ये भारताचाही नंबर लागतो.
  • पर्यावरण आणि आपत्ती यांचा थेट संस्कृतीशी संबंध आहे. पर्यावरणाची चिंता जोपर्यंत संस्कृतीचा हिस्सा बनत नाही तो पर्यंत आपत्तीपासून रक्षण होणे कठिण आहे.
  • मी जेव्हा सबका साथ बोलतो तेव्हा त्यात निसर्गाचा सुद्धा समावेश असतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version