राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक याचे एनसीबीचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांच्यावर आरोपसत्र सुरूच आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा सेंट पॉल, सेंट जोसेफ शाळेचा दाखला न्यायालयात सादर केला आहे. त्या शाळेच्या कागदपत्रांवर समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असून मुस्लिम धर्माची नोंद केली आहे. यावर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.
क्रांती रेडकर म्हणाल्या, ‘नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या बदनामीसाठी अर्धवट माहिती सादर केली असल्याचे क्रांती रेडकर यांनी सांगितले आहे. समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर चूक झाली असून १९८९मध्ये कागदपत्रांवरील ही चूक सुधारण्यात आली होती. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी कायदेशीर प्रक्रिया करत समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावरील चूक सुधारली असून त्यांची सुधारित कागदपत्रे मुख्याध्यापिकांनी स्विकारली असल्याचे’ क्रांती रेडकर यांनी सांगितले.
समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखला मलिकांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. समीर वानखेडेंच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ते मुस्लिम असल्याचे स्पष्ट होत आहे. नवाब मलिकांनी ही कागदपत्रे न्यायालयात सादर केली असून आता समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.